बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (09:07 IST)

नांदेड : दाढीच्या पैशावरून ग्राहकाचा निर्घृण खून

murder knief
नांदेडच्या किनवट येथे एका सलून मध्ये आर्धी दाढी झाल्यावर सलूनच्या मालकांमध्ये आणि ग्राहकामध्ये बाचाबाची झाली आणि परिणामी सलून मालकाने ग्राहकाचा रागाच्या भरात येऊन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यंकटी  सुरेश देवकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर अनिल मारुती शिंदे असे आरोपी सलून चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बोधडी येथे अनिल मारुती शिंदे या तरुणाचे बोधडी बाजारपेठेत सलूनचे दुकान असून बुधवारी सायंकाळी सलूनच्या दुकानात याच गावात राहणारा व्यंकटी सुरेश देवकर हा तरुण दाढी करण्यासाठी आला. अर्धी दाढी केल्यावर सलून चालक अनिल याने व्यंक्तींकडून दाढीचे पैसे मागितले. मयत तरुणाने दाढी पूर्ण केल्यावर देतो असे सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतरण हाणामारीत झाले. आणि रागाच्या भरात येऊन सलून चालकाने धारधार शस्त्राने गळा कापून व्यंकटी चा निर्घृण खून केला. 

घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळतातच सदर मयत व्यंकटीच्या संतप्त नातेवाईकांनी जमावडा करून सलून चालकाचा सलूनची तोडफोड केली आणि सलूनला आग लावून सलून चालकाचा शोध घेऊन भर बाजारात त्याला ठेचून मारून खून केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच
घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सुरु आहे.