संबंधित माहिती
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २ हजार ३३४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता
- पंकजा मुंडेंना भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान नाही, माधव भांडारींचं मुख्य प्रवक्तेपद काढलं
- ठाकरे सरकारचा भूमिपुत्रांसाठी महत्त्वाचा निर्णय
- अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
- रुग्णवाहिका, खासगी वाहने जिल्हा प्रशासन अधिग्रहीत करणार
तर ‘तुमचे गोडाऊन आमचे लॉक’ मनसेचा अॅमेझॉन ला इशारा
अमेझॉन कंपनीने मेगाभरतीच्या ऑनलाइन प्रक्रियेत मराठी भाषा वगळ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पक्षाच्या रोजगार विभागाने जाहिरात प्रक्रियेत इतर भाषांबरोबर मराठी भाषेचाही तत्काळ समावेश करण्यात यावा अशा आशयाचे लेखी पत्र कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला (कस्टमर सर्व्हिस) पाठवले असल्याचे मनसे रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी सांगितले.
अमेझॉनने ही ऑनलाइन सेवा पुरवणारी कंपनी त्यांच्या वी.सी.एस work from home options यात भरती करत असून देशातील विविध ठिकाणी सेवा केंद्र उघडत असताना पुण्यात देखील उघडणार आहे. असे असताना इतर भाषेंमध्ये नोकरीसाठी नोंदणी फॉर्म भरण्यासाठीचे पर्याय खुले आहेत. मात्र महाराष्ट्राची राजभाषा असणाऱ्या मराठीला वगळण्यात आल्याने मनसेने कंपनीला पत्र लिहून जाब विचारला आहे. येत्या सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करा, तसे न केल्यास ‘तुमचे गोडाऊन आमचे लॉक’ असा सज्जड इशाराही मनसे रोजगार अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी दिला.
