बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (17:32 IST)

पंकजा मुंडेंना भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान नाही, माधव भांडारींचं मुख्य प्रवक्तेपद काढलं

Pankaja Munde has no place in the BJP's state executive
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
असं असलं तरी कार्यकारिणीच्या प्रमुख पदांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे.
 
भाजपच्या महामंत्रिपदी चंद्रशेखर बावनकुळे असतील, तर एकूण 12 जण पक्षाच्या उपाध्यक्षपदी असतील. यामध्ये राम शिंदे, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आदींचा समावेश आहे.
 
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये असतील,तर आयटी विभागाचे प्रमुख आशिष कुलकर्णी असतील.
 
तर आधीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांना प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे.