शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (16:34 IST)

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चा, समीर भुजबळ यांना अटक

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी परवानगी न घेता मोर्चा काढल्याने माजी खासदार समीर भुजबळ यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा काढण्यात येणार होता. पण या मोर्चाला पुणे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. मोर्चासाठी परवानगी नसल्यानेच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. 
 
राज्य सरकारने उच्च व सर्वोच न्यायालयात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसेच मराठा समाठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली होती. यासह विविध मागण्यांसाठीच हा भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसोबतच अनेक सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या आहेत. ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई तसेच आरक्षणाची मागणी करणारे, आरक्षण टिकवण्याची मागणी करणारे फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये अशी भूमिका महात्मा फुले समता परिषदेतर्फे मांडण्यात आली आहे.