शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:02 IST)

मराठा आरक्षणाबाबत सुपर न्यूमररीबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक : संभाजीराजे

मराठा आरक्षणाबाबत सुपर न्यूमररीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे सकारात्मक आहेत. कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेणार आहेत. खासदार संभाजीराजे  यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीनंतर ही माहिती दिली. वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली.
 
SECB ला धक्का लागू नये यासाठी कायदेशीर बाबी तपासून  याविषयी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार आहेत. लवकरच निर्णय होईल. सुपरन्यूमररीविषयी सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. सुपर न्युमररी पद्धतीने जागा कशा वाढवायच्या यावर अधिक चर्चा झाली. यावर सरकार सकारात्मक आहे. लवकरच युद्धपातळीवर बैठक होणार आहे. सरकार वकिलांशी चर्चा करणार आहेत, असे संभाजीराजे यांनी माहिती दिली.