पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर पंकजा यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्याबद्दलची अपडेट त्यांनी दिली. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन. त्यानंतरच मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावेन अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली.
“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आवाहन करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी ट्विट करत रात्री उशिरा यासंदर्भातील माहिती दिली होती.