शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:41 IST)

हे सगळं काही फारच धक्कादायक आणि अनपेक्षित आहे, दिगंत आमटे यांची प्रतिक्रीया

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. त्यानंतर आमटे कुटुंबातील डॉ. दिगंत आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे,” असं डॉ. दिगंत म्हणाले. डॉ. दिगंत हे प्रकाश आमटे यांचे चिरंजीव आणि डॉ.शीतल आमटे यांचे चुलत भाऊ आहेत.
 
डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारीआनंदवन येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावर बोलताना, “हे सगळं काही फारच धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व धक्क्यात आहोत,” असं डॉ. दिगंत आमटे म्हणाले. तसेच, सध्या काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.