शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (08:25 IST)

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्रं खेळत होता Pubg,नंतर उचललं टोकाचं पाऊल

पब्जी (Pubg)या गेमच्या आहारी गेल्यामुळे एक तरुण मुलानं गळफास घेवून आत्महत्या केली आहे. निखिल पुरुषोत्तम पिलेवान असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. निखिल यानं घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेवून स्वत:ला संपवलं आहे. 
 
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपुर या गावात ही घटना घडलेली आहे. निखिल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये कामावर होता. बीए फायनलचे पेपर देण्यासाठी तो गावाकडे आलेला होता.