शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (08:52 IST)

धक्कादायक, पतांजलीच्या लायसन्स अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख नव्हता

बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती. पतंजलीच्या करोनावरील औषधाबद्दल उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांना खळबळजनक माहिती दिली आहे. पतंजलीनं दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आलं. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे,” असं समजत.
 
करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपिठानं हे औषध शोधलं असून, मंगळवारी हे औषध लॉन्च करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता.