मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (09:00 IST)

मी शिवसैनिकच राहीन : उर्मिला मातोंडकर

काँग्रेस पक्षाचा मी राजीनामा दिला होता. मात्र, मी राजकारण सोडलेले नव्हते. जमिनीवरून उतरून काम करायचे आहे. मी शिवसैनिकच राहीन. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. सेक्यूलर म्हणजे इतर धर्मांना विरोध नव्हे. हिंदू धर्माचा चांगला अभ्यास माझा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष प्रवेश करावा, याकरिता फोन आला होता. तसेच काँग्रेस सोडली असली तरी कधी काँग्रेसवर टीका केली नाही. सगळ्यांशी माझे मत चांगले आहे. आज कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले आहे, असे शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले. 
 
मी शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. मी कोणावर टीका करणार नाही. मी चांगले काम करण्याला प्राधान्य देणार आहे. मला अनेक जण ट्रोल करत आहेत. त्यांचे त्यांनी काम करावे, मी माझे काम करत राहणार मी कोणावर टीका करणार आहे. तसेच कंगना रानौत हिचा विषय संपला आहे. त्यावर बोलणे उचित नाही असे सांगितले.