बिश्नोई टोळीचा मोस्ट वॉन्टेड आरोपीला यवतमाळमध्ये अटक
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य आणि राजस्थान पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट असलेला भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याला यवतमाळ पोलिसांनी अटक करून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य आणि राजस्थान पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट असलेला भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याला यवतमाळ पोलिसांनी अटक करून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याला ड्रग्ज विरोधी कारवाईदरम्यान अटक करण्यात आली होती. आता प्रश्न असा निर्माण होतो की हा धोकादायक गुन्हेगार यवतमाळमध्ये का आला? त्याचा जिल्ह्याशी थेट संबंध होता का?
भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा उर्फ रघुवीर हा पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील अहरणा खुर्द गाव येथील रहिवासी आहे. तो लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर टोळीशी संबंधित एक कुख्यात कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. त्याच्याविरुद्ध पंजाब आणि राजस्थानमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे असे २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहे. अटकेनंतर यवतमाळ पोलिसांनी भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा याला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई यवतमाळ पोलिसांच्या दक्षता आणि गुप्तचर यंत्रणेचे मोठे यश मानले जात आहे.
Edited By- Dhanashri Naik