शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (10:34 IST)

मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून आईने केली आत्महत्या

लातूरच्या निलंगा तालुक्यातील निठुर येथे मुलाने आत्महत्येची बातमी ऐकून आईनेही आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.  
 
निठुर गावात नितीन सुभाष घोडके हा 30 वर्षीय तरुण आपल्या आई आशाबाई (50) सोबत राहायचा. शुक्रवारी नितीनने आई शेतात गेली असताना आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याचं जेव्हा आशाबाई यांना सांगण्यात आलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हातारपणात ज्या मुलाच्या आधारे आपल्याला जगायचे होते, तो आधारच आता राहिलेला नाही, आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, याचे दुःख आशाबाईंना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनीही शेतातच स्वत:ला गळफास लावून घेतला. दुसरीकडे  नितीन घोडकेने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.