शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 (21:17 IST)

दौंड येथे आईने केली स्वत:च्या मुलांची हत्या, पतीवर कोयत्याने हल्ला केला

Mother kills her own children in Daund
दौंडच्या स्वामी चिंचोली गावात कौटुंबिक वादातून एका महिलेने स्वत:च्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या महिलेने स्वत्:च्या पतीवर कोयत्याने वार केले. 

पिंटू दुर्योधन मिंढे वय वर्ष अडीच , शंभू दुर्योधन मिंढे वय वर्ष सव्वा अशी दोन्ही मयत झालेल्या मुलांची नावे आहे. या प्रकरणी आरोपी आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने आपल्या पतीवर तो झोपेत असताना कोयत्याने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात पती दुर्योधन आबासाहेब  मिंढे वय वर्षे 36 हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती दौंड पोलिस निरिक्षकांनी दिली आहे. 
जखमी दुर्योधन मिंढे हे माहिती तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. सध्या ते घरातून काम करत आहे. त्यांची पत्नी शिक्षित आहे. हे कुटुंब स्वामी चिंचोली गावात शिंदे वस्ती भागात वास्तव्यास आहे.शनिवारी पहाटे 5 :30 वाजेच्या सुमारास आरोपी पत्नी ने गळा आवळून आपल्या दोन्ही मुलांचा निर्घृण खून केला. नंतर झोपेत असलेल्या आपल्या पतीवर कोयत्याने वार केले. 
एकाएकी हल्ला झाल्यावर दुर्योधन यांनी आरडाओरड केला. त्यांचे ओरडने ऐकून त्यांचे आई वडील आणि भाऊ झोपेतून जागे झाले आणि आवाजाच्या दिशेने धावत आले. घडलेले सर्व बघून ते हादरले.त्यांनी जखमी दुर्योधन यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. 
  Edited By - Priya Dixit