गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (11:29 IST)

आईकडून दोन मुलांची हत्या

crime
औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणभावाचा राहत्या घरता संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे दोघेही रात्री आई वडिलांसोबत जेवण करून झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. 
 
मुलांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपासणी सुरू केली असून त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मतात्या आईनेच रात्री मुले झोपेत असतानाच त्यांची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. यांनतर पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आणि कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे की तिने आपल्या दोन्ही मुलांना का मारले. पोलिसांच्या तपासणीत हे ही लक्षात आले आहे की आरोपी आई मनोरुग्ण आहे.