रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (08:36 IST)

खासदार राहुल शेवाळे यांनी दैनिक सामना व दोपहरा का सामनाला नोटीस पाठवली

Rahul Shevale
खासदार राहुल शेवाळे यांनी दैनिक सामना व दोपहरा का सामनाला नोटीस पाठवली आहे. चुकीचे वृत्त दिल्याने माझी नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळे बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
 
दैनिक सामनाचे संपादक, कार्यकारी संपादक, पत्रकाराला ही नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या नोटीसला काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खासदार शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. मात्र हे आरोप खोटे आहेत. मला जाणीवपूर्वक याप्रकरणात गोवण्यात आले आहे. मुळात या महिलेचेच दाऊदशी संबंध आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.
 
खासदार शेवाळे यांच्या या दाव्याचेही पीडित महिलेने सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारीत करत उत्तर दिले. मी दुबईची आहे. मी फॅशन डिझायनर आहे. मी अथक परिश्रम करुन करिअर केले आहे. मी दुबईची असल्याने अनेक देशात माझे मित्र आहेत. पाकिस्तान असो की बांगलादेश तेथील माझे मित्र आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप केले आहेत, असा दावा पीडित मुलीने केला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor