मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (16:18 IST)

एमपीएससीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

करोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि  अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
 
एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आता वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे. तसेच करोना विषाणू संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून घेण्यात येईल. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.