मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 मे 2020 (08:37 IST)

मोठी घोषणा : १ जूनपासून नॉन एसी रेल्वे सुरू होणार

गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. मात्र आता रेल्प्रवे वासी वाहतूक पुन्हा सुरू होणार असून रेल्वेमंत्र्यांनीच ट्वीटवरून ही घोषणा केली आहे. येत्या १ जूनपासून देशात नॉन एसी रेल्वे सुरू होणार असून त्याची ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनीच  ट्वीट करून स्पष्ट केलं  आहे. देशभरात रोज २०० रेल्वे धावणार आहेत. मात्र, त्याचे बुकिंग नेमके कधीपासून सुरू होणार, याविषयी मात्र रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिलीली नाही. दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना नेणाऱ्या श्रमिक ट्रेन सध्या दिवसाला २०० धावत आहेत. लवकरच त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं देखील रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.