शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (19:54 IST)

MPSC परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

MPSC परीक्षेचा अंतिम निकाल जाहीरभरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या.  मात्र आता अखेर हा निकाल लावण्यात आला आहे.
 
MPSC ना या निकालात निवडझालेल्या एकूण  420 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून निकालाची वाट बघणाऱ्या उमेदवारांना आता MPSC नं दिलासा दिला आहे.
 
सर्व प्रवरांगातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.