शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (15:49 IST)

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठापणाला

देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोट निवडणुकांचा  कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. कोरोना संसर्गाने काँग्रेसचे आमदार रावसाहेबअंतापूरकर यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.या जागेसाठी ३० ऑक्टोबरला मतदान होणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
 
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपने जोरदार झटका दिल्यानंतर देगलूरसाठीही भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

तर काँग्रेसनेही ही जागा आपल्याच ताब्यात राहावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अशोक चव्हाण यांचा नांदेड हा बालेकिल्ला आहे.
त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे राहण्यासाठी चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली आह.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदार संघातून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले होते.त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत या मतदार संघावर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी झेंडा फडकवला मात्र २०१९ च्या निवडणुकीत अंतापूरकर हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणला.
 
पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या निवडणुका पार पडणार आहेत.निवडणूक आयोगाकडून ५ ऑक्टोबर मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार असू असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
 
२७ सप्टेंबर – नामनिर्देशनपत्रे मागे घेणे
 
२९ सप्टेंबर – निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र मागे घेणे
 
५ ऑक्टोबर – मतदान
 
६ ऑक्टोबर – मतमोजणी