रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (15:37 IST)

नाशिक: पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचा चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार

महिलांवरील वाढते अत्याचार व गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. अशातच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
नाशिकमध्ये सिडको परिसरातील श्रीराम नगरमध्ये (ता.27) रात्री ही धक्कादायक घटना घडली. ब्युटी पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला असल्याची माहिती मिळत आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि सध्या पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने हे कृत्य केल्याचं समजत आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासह पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अंबड पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.