शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (14:32 IST)

बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, एनडीआरएफ तैनात

धुवाधार पावसाने बीड जिल्ह्यात थैमान मांडला आहे. जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्तयात परिस्थिती गंभीर दिसून येत आहे. यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुले वाहून गेली आहेत तर धरणे भरली आहे.
 
येथील स्थिती बघून एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत.
 
जिल्ह्यात सोमवारी रात्रभर जोरदार पावसाने हाजिरी लावली आहे. मध्यरात्रीपासून मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. केज तालुक्तयात बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे तसचे रस्ते बंद करावे लागले आहेत. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि नागरिकांना सर्तक राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.