गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (11:38 IST)

काय सांगता,सूड घेण्यासाठी माकड 22 किमी दूरवर पोहोचला,ऑटो चालक भीतीपोटी 8 दिवस घरात बंद होता

एखाद्याने सूड घ्यायचे ठरवले तर तो घेतोच.मग तो प्राणी असो किंवा मानव.अशेच काही घडले आहे.कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील कोटिगेहरा गावात.येथे एक माकडाने सूड घेण्यासाठी 22 किमी प्रवास केला.
 
अहवालानुसार,ही घटना कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील कोटिगेहेरा गावातील आहे.येथे एक माकड शाळेजवळच्या लोकांशी भांडत होता.या नंतर शाळेतील अधिकाऱ्यांनी माकड पकडण्यासाठी वनविभागाकडे तक्रार केली.त्यात जगदीश नावाच्या ऑटोचालकाने माकड पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.दरम्यान माकडाने त्याचावर हल्ला देखील केला.
 
मात्र, 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हे माकड पकडले गेले आणि वन विभागाच्या टीमने त्याला दूरच्या जंगलात सोडले.वन विभागाने माकडाला शहराबाहेर नेऊन 22 किलोमीटर अंतरावरील बालूर जंगलात सोडले होते.काही दिवसांनी माकड पुन्हा गावात परतले.असे सांगितले जात आहे की माकड गावात आल्यापासून ऑटो चालक  घराबाहेर पडण्यास घाबरत आहे.सांगितले जात आहे की तो 8 दिवसांपासून घराबाहेर पडला नाही.
 
जगदीशच्या मते, जेव्हापासून मी ऐकले की माकड गावात परतले आहे, तेव्हापासून मला भीती वाटू लागली आहे. मला माहीत आहे ते तेच माकड आहे कारण मागच्या वेळी आपण सर्वांनी त्याच्या कानावर एक खूण पाहिली होती. दरम्यान, वन विभागाने पुन्हा माकडाला पकडून दूर जंगलात पाठवले आहे.