सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (13:20 IST)

काय सांगता,आकाशातून पडला सोनेरी दगड !

सध्या चे युग चमत्काराचे युग झाले आहे.दररोज विविध प्रकारच्या चमत्कारिक बातम्या ऐकू येतात.उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावात एका शेतकरीच्या शेतात घडले.या शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून एक मोठा दगड पडला. जवळ जाऊन पाहिले तर हा दगड चक्क सोनेरी रंगाचा होता.दगड त्यांच्या अगदी जवळच पडल्यामुळे ते थोडक्यात बचावले.या दगडाचे वजन दोन किलो 38 ग्राम असल्याची माहिती मिळत आहे.

शेतकरी प्रभू निवृत्ती माळी हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्या अगदी जवळ हा दगड येऊन पडला. त्यात ते थोडक्यातच बचावले.पण घडलेल्या घटनेमुळे ते घाबरून गेले.त्यांनी या घटनेची माहिती तहसीलदारांना सांगितली आणि हा सोनेरी दगड तहसील कार्यालयात जमा केला.आणि उस्मानाबादच्या भूजल सर्वेक्षण विभागाला या घटनेची माहिती दिली.

काही वेळा उल्कापात होतात हे देखील उल्कापाताचा प्रकार असू शकतो.या संदर्भात अधिक माहितीसाठी भूवैज्ञानिक विभाग या दगडाची चाचणी करणार आहे.नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये असे सांगण्यात आले आहे.