सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (11:05 IST)

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची स्मशानात पूजा

आजच्या आधुनिक काळात तंत्र मंत्र जादू टोण्यावर विश्वास ठेवणारे सुद्धा आहे.जग किती पुढे वाढले आहे.तंत्रज्ञान विकसित झाले असतानाही लोक अंधश्रद्देला बळी पडत आहे.आज ही देशात काही भागात तंत्र-मंत्राचा वापर सर्रास केला जात आहे.असाच एक धक्कादायक प्रकार साताऱ्यातील सुरूर या ठिकाणी घडला आहे. एका अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीच्या कट्ट्यावर बसवून तिच्या मांडीवर कोंबडा ठेऊन कोंबड्यावर कुंकू वाहून मांत्रिकाने पूजा केल्याच्या धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.आपल्या या कृत्याचा कोणीतरी व्हिडीओ बनवत आहे.हे समजतातच मांत्रिकासह मुलगी आणि तिचे नातेवाईक पसार झाले आहे.

या व्हिडीओ मध्ये मुलीला कुंकवाच्या वर्तुळात बसवून तिच्या मांडीवर मांत्रिकाद्वारे पूजा करत असताना दिसत आहे.तसेच मांत्रिकाच्या समोर लिंबू,अंडे,नारळ असे साहित्य ठेवलेले दिसत आहे. मांत्रिक,मुलगी आणि तिचे नातेवाईक या घटनेनंतर पसार झाल्याचे वृत्त आहे.सध्या या व्हिडीओ मुळे अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे.