रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (09:49 IST)

रेल्वेच्या धडकेत बाप- लेकाचा दुर्दैवी अंत

लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत अंदोरी (ता. खंडाळा) येथील शैलेश बोडके आणि त्यांचा एक वर्षांचा मुलगा यांचा दुर्दैवी अंत झाला.
 
शैलेश बोडके हे एसआरपीमध्ये कार्यरत होते.  पुणे-मिरज मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी सांयकाळी बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस रेल्वे (गाडी नंबर ०६५०६) या रेल्वेच्या धडकेमध्ये शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय -२८) आणि त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा कु. रुद्र बोडके यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.
 
या घटनेबाबत रेल्वे पोलिसांकडून आणि घटना स्थळावरून मिळालेली आधिक माहिती अशी की शैलेश बोडके हे  धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मुंबई पोलिसदलामध्ये आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आले होते. शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांच्या मृत्यू झाला.
 
या घटनेत पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याने अंदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.