1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:40 IST)

चार प्रमुख स्टील कंपन्यांकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची बेहिशेबी नोंद

जालना येथील चार प्रमुख स्टील कंपन्यांकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची बेहिशेबी नोंदी झाल्यानंतर या कंपन्यांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.जालना,औरंगाबाद, पुणे येथे ३२ ठिकाणी टाकण्यात आले.बेहिशेबी संपत्ती आणि व्यवहाराची ही रक्कम २०० कोटींच्या घरात असावी असा आयकर विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज होता.पण कंपनीच्या परिसरात बराच कच्चा माल विनानोंदीचा होता.त्यामुळे हा व्यवहार आणखी १०० कोटी रुपये वाढेल असा आयकर विभागाचा अंदाज असल्याचे आयकर विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 
जालना येथील या चार कंपन्याची नावे न देता आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला असून टाकण्यात आलेल्या छाप्यात बेहिशेबी संपत्तीशी संबंधित कागदपत्रे तसेच डिजिटल कागदपत्रे उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या या व्यवहारातील १२ बँकांच्या तिजोरीतील रोख रक्कमही समोर आली असून, ती दोन कोटी १० लाख रुपये एवढी आहे.