सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (21:54 IST)

सर्व महामार्गांची 15 ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा, राज्य सरकारचा आदेश

राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची 15 ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा असे निर्देश राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अतिवृष्टीमुळे मुंबई-नाशिक  आणि मुंबई-गोवा महामार्गासह  राज्यातील सर्व महामार्गांची अवस्था खराब झाली आहे. या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
 
मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे त्यातच अतिवृष्टीमुळे या महामार्गाची चाळण झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला होता. अशीच काहीशी अवस्था मुंबई-नाशिक महामार्गाचीही आहे. राज्यातील प्रमुख रस्ते अक्षरश: खड्डेमय झाले आहेत.  बैठकीत याची दखल घेण्यात आली आणि महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.