रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (21:44 IST)

पुणे-सातारा महामार्ग टोलमुक्त असल्याचं जाहीर, मात्र टोलवसूली सुरूच

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-सातारा महामार्ग टोलमुक्त असल्याचं जाहीर केलं. मात्र, त्यानंतर २ दिवसाच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या उलट भूमिका घेत टोलवसूली सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे गडकरी विरुद्ध एनएचएआय अशी परिस्थिती तयार झालीय. रिलायन्स इंफ्रानकडून टोल वसुलीचं काम आपल्याकडे घेतलं जाणार असल्याचंही एनएचएआयने म्हटलं.
 
एनएचएआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, “एनएचएआय पुढील काही काळासाठी पुणे-सातारा महामार्गावरील टोल वसुलीचं काम आपल्याकडे घेईल. या काळात देखभाल दुरुस्तीशी संबंधित काम एनएचएआय करेल. या कामासाठी आम्ही 50 कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स सोबतच्या करारानुसार महामार्ग रिलायन्सकडे सुपुर्द केला जाईल.”
 
एनएचएआयने महामार्गाचं काम आपल्याकडे घेतल्यानंतर टोलमध्ये सूट देण्याचा किंवा टोलच्या दरात सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.