शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (21:48 IST)

ईडीची कारवाई सुरु असतानाच अडसुळांना नेले रुग्णालयात

सिटी कोऑपरेटीव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढल्या असून, सोमवारी सकाळी ईडीचं एक पथक त्यांच्या  चौकशीसाठी दाखल झालं. यावेळी अडसूळ यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेनं थेट रुग्णालयात नेण्यात आलं. मुंबईतील लाईफ लाईन मेडिकेअर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
दरम्यान, सिटी कोऑपरेटीव्ह प्रकरणात 800 कोटींचा बँकेचा टर्नओवर असताना 900 कोटींचा घोटाळा कसा, असा प्रतीप्रश्न अडसुळांनी केल्याचं कळत आहे. ईडीची कारवाई सुरु असतानाच अडसुळांना रुग्णालयात नेण्यात आलं. याचवेळी ईडीची एक टीम ही अडसुळांच्या घरी असून, दुसरी टीम त्यांच्यासोबत रुग्णालयात गेली आहे.