शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (14:40 IST)

Video ताजुद्दीन महाराजांच्या निधनाची घटना कॅमेऱ्यात कैद

औरंगाबाद- हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ताजुद्दीन बाबा यांचे सोमवार रात्री कीर्तन करताना दुर्दैवी निधन झाले आहे. कीर्तन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मंचावर त्यांचे निधन झाले. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
 
किर्तनकार ताजुउद्दिन महाराज शेख यांचे किर्तन नंदूरबार जवळील जामोद या गावी किर्तनसेवा चालू असताना छातीत दुखत असल्याने खाली बसले. जास्त त्रास होत असल्यामुळे ते एका वारकरी संप्रदायातील व्यक्तीच्या मांडीवर झोपून गेले. त्यांनी त्याठिकाणी अखेरचा श्वास घेतला.
 
ताजुद्दीन बाबा हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांची देऊळ उभे केले होते. संत ताजुउद्दिन महाराज शेख यांच्यावर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गोंधलापुरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे शूट करत होते त्यामुळे ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
 
कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठीच भक्तांची मोठी गर्दी होत होती. तसेच त्यांचे किर्तन युट्यूबवरही अपलोड केलेले आहेत. ताजुद्दीन बाबा यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती.