1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 मार्च 2025 (17:33 IST)

महिला दिनानिमित्त एमटीडीसीची पर्यटनावर 50 टक्के सूट शंभूराज देसाई यांनी दिली माहिती

Shambhuraj Desai
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे  एमटीडीसी 1 मार्च ते 8 मार्च या कालावधीत राज्यातील एमटीडीसी पर्यटक निवासस्थानांमध्ये महिला पर्यटकांना 50 टक्के सवलत देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.  ते म्हणाले, ',मी महिला केंद्रित /लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे.  
ते म्हणाले,  एमटीडीसीने महिलांना समर्पित 'मी ' हे महिला केंद्रित पर्यटन धोरण लागू केले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, अधिक सोयीस्कर आणि अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिला दिन 2024 निमित्त एमटीडीसीच्या विशेष सवलतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेचा लाभ 1,500 हून अधिक महिला पर्यटकांनी घेतला. सकारात्मक प्रतिसादामुळे ही योजना 2025 मध्ये देखील लागू केली जाईल.
महिला पर्यटक www.mtdc.co या वेबसाइटला भेट देऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.पर्यटन क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले. 
Edited By - Priya Dixit