शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोदी हुकुमशहा आणि नोटबंदी मूर्खपणा - कर्णिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा मुर्खपणाचा होता. मोदी यांनी केवळ स्वत:ची ताकद सिध्द करण्यासाठी निर्णयाची जनतेतून काय प्रतिक्रिया येते, जनता ते सहन करते का? याचा अंदाज घेण्यासाठी हा हुकूमशाही पद्धतीचा निर्णय घेतला होता. मात्र यातून त्यांना कोणी विरोध केला नाही. जनतेला हवालदिल केले. मात्र हुकूमशाही वृत्तीला जनता भिरकावून द्यायला लावेल, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचेही परखड विचार समाजशास्त्रज्ञ व शिक्षण अभ्यास मुग्धा कर्णिक यांनी व्यक्त केले.