शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (17:05 IST)

वाचा, मोहरमची नेमकी सुट्टी कधी ?

मोहरम हा इस्लामिक दिनदर्शिकेचा पहिला महिना आणि रमजाननंतरचा दुसरा पवित्र महिना आहे. हिर्जी दिनदर्शिकेनुसार इस्लामिक नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. हिरजी दिनदर्शिका चंद्राच्या चक्रावर आधारित असते. ज्यामुळे ते ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा वेगळे आहे. मुहर्रम शब्दाचा अर्थ ‘परवानगी नाही’ किंवा ‘निषिद्ध’ असा आहे. म्हणून मुस्लिमांना युद्धासारख्या कार्यात भाग घेण्यास मनाई आहे. म्हणून हा महिना म्हणजे  प्रार्थना आणि चिंतन कालावधीसाठी पाहिला जातो.
 
भारतभर खरंतर मोहरम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भव्य मिरवणुका काढल्या जातात. परंतु यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा मेळाव्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे, राज्यांनी मोहरमच्या मिरवणुका काढण्याची परवानगी यंदा दिलेली नाही.
 
अनेक राज्य सरकारांनी मोहरमच्या सुट्ट्यांमध्ये बदल केला करून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. दिल्ली सरकारने बुधवारी मोहरमकरिता २० ऑगस्टच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. दरम्यान, त्यापूर्वी दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) १९ ऑगस्टच्या दिवशी म्हणजे आज हि मोहरमची सुट्टी जाहीर केली होती. मात्र, या संदर्भात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ही सुट्टी बदलून शुक्रवारी अर्थात २० ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात २० ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) मोहरमचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील विविध राज्यांनी मोहरम संदर्भात आपली मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.