बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (10:47 IST)

गोसेखुर्द धरण पाण्याची आवक नियंत्रणात येत नसल्याने आणखी 5 दरवाजे उघडले

गोसेखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरु असल्याने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अजून 5 दरवाजांची भर पडली असून गोसेखुर्द धरणाचे सद्धा 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत.विशेष म्हणजे काल 2 दरवाजे उघडण्यात आले होते. आता 7 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडण्यात आले असून यातून 771.113 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 
गोसेखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात (9 जिल्ह्यात) सतत पाऊस सुरु असल्याने धरण प्रशासनाकड़ून सतर्क राहून निर्णय घेण्यात येत आहे.धरणाला संपूर्ण नियंत्रणात येण्यास संभाव्य अजून काही दिवस लागणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाद्वारे नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.