रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:23 IST)

फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यात बुडून दोन बालके ठार

मुंबई येथील वांद्रे बेहरामपाडा भागात ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली होती. पाण्याचा वेग आणि कमी जागेत जमा झालेले पाणी  अचानक तयार झालेल्या पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला  आहे . यामध्ये दोघे बहिण भाऊ आहेत त्यांची नवे   विघ्नेश डोईफोडे आणि प्रियंका डोईफोडे अशी आहेत. यामध्ये मृत पावलेल्या  विघ्नेश  8 महिन्यांचा तर, प्रियंका नऊ वर्षांची होती. त्यांना तात्काळ नजीकच्या भाभा हॉस्पिटल आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केले.महापालिका आणि प्रशासनाच्या चुकीमुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे असे आरोप आता नागरिक करत आहेत.