मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत आपला महापौर बसला पाहिजे: भाजप मुख्यालय

मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिका निवडणुकीत  भाजपानेही शिवसेनेला टक्कर दिली आहे.  2012 च्या निवडणुकीत फक्त 31 जागा मिळवणा-या भाजपाने उंच झेप घेत 82 जागा मिळवल्या आहेत. इतक्या भक्कम परिस्थितीत असताना महापौरपदावरचा दावा सोडू नका, कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्ली मुख्यालयातून भाजपा नेत्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दुसरीकडे  बहुमत न मिळाल्याने आता शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार की दुसरे पर्याय निवडणार याकडे सर्वांचं लक्ष असून नेमकी काय भूमिका दोन्ही पक्ष घेणार आहेत हे येणा-या दिवसांमध्ये कळेल. शिवसेनेत दोन अपक्षांनी प्रवेश करत पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 86 वर पोहोचला आहे.