गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईतल्या कोस्टल रोडला अंतिम मंजुरी, वाहतुकीची कोंडी फुटणार

मुंबईतल्या कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. नरिमन पाइंट ते कांदिवलीच्या समुद्रालगत हा कोस्टल रोड होणार आहे. कोस्टल रोड झाल्यास पश्चिम उपनगरांतील वाहतुकीची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
अनेक वाद व विविध ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत बराच काळ रखडलेल्या सागरी मार्गातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीनेही सहमती दर्शविल्यामुळे मरीन ड्राइव्ह ते कांदिवली या सागरी मार्गाचे मुंबईचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. सर्व महत्वाच्या परवानगी मिळाल्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रेपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामाला पावसाळ्यानंतर सुरुवातही होणार आहे.