रेल्वे रुळालगत जिलेटीनच्या कांड्या
काही दिवसांपूर्वी रेल्वे मार्गावर लोखंडाचे तुकडे सापडले होते तर आता पुन्हा एक मोठा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मुंबईची जीवनरेखा असलेल्या लोकलच्या दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर स्फोटकं सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तळोजा ते नावडे रेल्वे स्थानकादरम्यान जिलेटीनच्या तीन कांड्या सापडल्या आहे. यामुळे रेल्वेमार्गावर घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
पनवेल आणि दिवा रेल्वेमार्गावर कळंबोलीजवळ रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे सापडल्याची घटना ताजी असताना याच मार्गावर जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आहेत. गँगमॅनला सकाळी 9 च्या सुमारास या कांड्या सापडल्याआहेत. त्यामुळे पोलीस सक्रीय झाले असून तपास करत आहेत.
पुढील लेख
