सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (17:41 IST)

मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर

अदयाप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच  राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 45 नावं असून यामध्ये डॉक्टर आणि वकिलांचा समावेश आहे. दुसरीकडे यादी जाहीर करून राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाच केली आहे. अद्याप तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झालेली नाही.