मुंबई नागपुर आता फक्त 3 तासात तर नाशिक अवघ्या काही मिनिटात
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते . तसेच भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिली. यावेळी तिथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गाच्या बाजूने चालू करणार असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई पासून नागपूर पर्यंत समृद्धी महामार्ग आहे . त्याच्या बाजूने हाय स्पीड बुलेट ट्रेन सुरू करणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले असून पुढील महिन्यात मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात दिल्लीत बैठक होणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसहेब दानवे यांनी दिली आहे . त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन साठी जागा देखील तयार असल्याचे म्हटले आहे . बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर तीन तासात प्रवास करतात येणार असल्याचेही यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले आहे.
2019 मध्ये बुलेट ट्रेनचा कॉरिडोरचा प्रस्ताव
मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा रेल्वे कॉरिडोर प्रोजेक्ट चा प्रस्ताव 2019 मध्ये पास झाला होतामुंबई – नागपूर बुलेट ट्रेन एका वेळी 700 लोकांना 741 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करणार असल्याचे सांगितले गेले होते तसेच बुलेट ट्रेन ला मुंबई ते नागपूर दरम्यान खापरी डेपो वर्धा पुलगाव कारंजा लाड मालेगाव जहांगीर मेहकर जालना औरंगाबाद शिर्डी नाशिक इगतपुरी आणि शहापूर हे स्टेशन असणार असल्याचे सांगितले गेले होते मुंबई नागपूर बुलेट ट्रेन ही 350 प्रति किलोमीटरच्या वेगाने प्रवास करणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor