मुंबई पोलिस हाय अलर्टवर, 15 जानेवारीला मतदान, 16 रोजी मतमोजणी
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक 2026 साठी मुंबई पोलिसांनी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. मुंबईतील सर्व 227 वॉर्डमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक 2026 साठी मुंबई पोलिसांनी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. मुंबईतील सर्व227 वॉर्डमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 16जानेवारी रोजी होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांना पूर्ण सतर्क ठेवण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या थेट देखरेखीखाली एक व्यापक सुरक्षा योजना राबविण्यात आली आहे.
10 अतिरिक्त पोलिस आयुक्त
33 पोलिस उपायुक्त म्हणजेच डीसीपी,
84 सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणजेच एसीपी,
3000हून अधिक पोलिस अधिकारी आणि
25000 हून अधिक पोलिस तैनात केले जातील.
याशिवाय, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात एसआरपीएफ, क्यूआरटी, बीडीडीएस, राखीव पोलिस दल आणि होमगार्ड्सची अतिरिक्त तैनाती देखील केली जाईल.
नागरिकांकडून सहकार्याचे आवाहन
निवडणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, संशयास्पद हालचाल किंवा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित 100 किंवा 112 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
निष्पक्ष, शांततापूर्ण आणि सुरक्षित निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत आणि संपूर्ण शहरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे.