Daily Horoscope
✕

व्हायरल ‘लेटरबॉम्ब’वर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

Updated: मंगळवार, 9 जानेवारी 2024 (09:18 IST)
 
दरम्यान, शुक्रवारपासून व्हायरल होणा-या या पत्राने खळबळ निर्माण केली आहे. मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांनी पोलिस उपायुक्त, दोन निरीक्षक, तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे हे पत्र आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून सारवासारव केली जात असली तरी या ‘लेटरबॉम्ब’ने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
 
सदर अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करणा-याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असे मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबईचे पोलिस आयुक्त, सर्व पोलिस सहआयुक्त यांच्या नावाने पोस्टाच्या माध्यमातून धाडण्यात आलेल्या पत्राची प्रत शुक्रवारपासून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली. हाहा म्हणता संपूर्ण पोलिस दलात ते प्रत्येकापर्यंत पोहोचले. मोटर परिवहन विभागातील आठ महिला कर्मचा-यांचे नावे आणि सह्या या पत्रावर आहेत. चालक म्हणून कार्यरत असलेल्या या महिला पोलिसांनी वरिष्ठ अधिका-यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

महाराष्ट्रातील हिंगोली येथे पहिले मराठी भाषेचे कार्यालय सुरू झाले

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मलेशियाला पराभूत करून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १२.२० कोटी रुपये किमतीचा चरस जप्त

सांताक्रूझ आणि माहीम दरम्यान २८/२९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ४ तासांचा ब्लॉक

मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा, रोहित शर्माची कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती

पुढील लेख
Show comments