सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई- पुणे- नाशिक सुवर्ण त्रिकोण पूर्ण करणार : मुख्यमंत्री

मुंबई, पुण्यासह नाशिकच्या विकासासाठी मुंबई- पुणे- नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीप्रसंगी ते बोलत होते.  
 
मुख्यमंत्री म्हणाले, मालेगांव तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. मालेगांवच्या सर्वांगिण विकासावर भर देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. येत्या काळात या संदर्भातील कार्यवाहीला गती देण्यात येईल. राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र कार्यवाही करण्यासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात येईल. नदीजोड प्रकल्प, पाणी आरक्षण प्रश्नांबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत लोकप्रतिनिधींमार्फत आलेल्या सुचनांचा निश्‍चितपणे विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.