सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (09:24 IST)

मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, सोमय्या यांची मागणी

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत सोशल मिडियावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे अशी मागणी केली आहे. जोपर्यंत या संपुर्ण प्रकरणातून धनंजय मुंडे मुक्त होत नाहीत, तोवर त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे.