मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जुलै 2018 (17:04 IST)

खुरप्याने केला पतीने पत्नीचा खून, कारण अस्पष्ट

एक गंभीर खुनाचा प्रकरण कोल्हापूरमध्ये समोर आले असून, कागल तालुक्यातील भडगावमध्ये पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला आहे. मात्र या नराधम पतीने शेतात वापरण्यात येणाऱ्या खुरप्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमानुष कृत्याबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. दिपाली पोवार असं या पत्नीच नाव आहे. पोवार ने  खुरप्याने पत्नीवर सपासप वार करून तिचा जीव घेतला असून, जेव्हा  शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण आरोपी पती मात्र फरार आहे.हा खून करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.