रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 13 जुलै 2018 (15:31 IST)

थरूर यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला ११ हजारांचे बक्षीस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आवाहन एका मुस्लीम तरुणाने केले आहे. या तरुणाने थरूर यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला रोख अकरा हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. मोहम्मद आमीर राशीद असे त्या तरुणाचे नाव असून जप जर २०१९ मध्ये सत्तेत आली तर आपल्या देशाचा हिंदू पाकिस्तान होईल असे वादग्रस्त वक्तव्यामुळे तो प्रचंड चिडला आहे.
 
‘थरूर यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या वक्तव्यामुळे फक्त हिंदूच्याच नाही तर देशभक्त मुस्लीमांच्या देखील भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचे हे वक्तव्य फक्त हिंदुस्थानसारख्या महान देशातील हिंदू मुस्लीमांना विभागण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या काँग्रेसचे नेते निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. त्यांना भाजपच्या काळात देशाचा विकास बघवत नाही, असे राशिदने सांगितले.