शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (11:25 IST)

Murder In Hospital : धक्कादायक ! शासकीय रुग्णालयात निर्घृण हत्या

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाने जवळच्या एका रुग्णाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक बातमी येत आहे.खून करणारा रुग्ण मनोरुग्ण असून सध्या त्याचावर उपचार सुरु आहे.हा मनोरुग्ण गेल्या 8 दिवसापासून छातीत दुखल्यामुळे रुग्णालयात उपचाराधीन आहे.तो मनोरुग्ण असून रुग्णालयातून पळून गेला होता. नंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पकडून परत रुग्णालयात आणून दाखल केले.
 
सोमवारी रात्री या मनोरुग्ण रुग्णाने आपल्या शेजारच्या बेडवर झोपलेल्या एका रुग्णाचा निर्घृण खून केला. सदर मनोरुग्ण आरोपीने मयत असलेल्या रुग्णाच्या डोक्यात सलाईन लावण्याच्या स्टॅन्ड ने सपासप तीन वार केले.आणि मयत रुग्णाकडे बोट दाखवून मोठ्याने किंचाळू लागला की'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है'.त्याच्या ओरडा ऐकून रुग्णालयात गोंधळ उडाला.
 
रुग्णालयातील कर्मचारी धावत आले आणि त्यांनी घडलेला प्रकार बघितला.बेडवर झोपलेल्या रुग्णाच्या डोक्यातून रक्ताची धार निघत होती.आणि रुग्ण मयत झाला होता.ताबडतोब पोलिसांना बोलावले.पोलिसांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करून अटक केले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.