प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून
प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना तुमसर येथील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
सचिन गजानन मस्के रा. शिवाजी नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चार जण जेवण करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. जेवण आटोपून हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा शुल्लक कारणावरून वाद झाल्यामुळे सचिनच्या पाठीवर व पोटावर तिक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. सचिनचा मृत्यू झाले हे कळाल्यानंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला.