रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (21:53 IST)

माथेफिरूकडून पत्नी-मुलाची हत्या, आरोपीला अटक

murder
नाशिकच्या श्रीरामपूर येथे रामनवमीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधम पतीने आपल्या पत्नी आणि पाच वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली आहे. एवढेच नव्हे तर या नराधमाने त्याच व्हिडीओ रिकार्डिंग करून आपल्या नातेवाईकांना पाठविले. या घटनेमुळे अवघ्या जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. बलराज दत्तात्रय कुदळे असे या माथेफिरू आरोपीचे नाव असून तो ट्रक चालक आहे. त्याने आपल्या पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून केला.खुनाचे कारण कौटुंबिक कलह सांगण्यात येत आहे. अक्षदा आणि शिवतेज असे या मयतांची नावे आहेत. कौटुंबिक कलहला कंटाळून आरोपी बलराजची  पत्नी रागावून माहेरी निघून गेली होती. राग शांत झाल्यावर ती माहेरून नुकतीच घरी परतली होती. पण बलराज चा राग शांत झाला नव्हता.

रविवारी सकाळी अक्षदा घरात काम करत असता बलराज ने तिच्यावर मागून डोक्यात कुदळ घातली. वार एवढा जबरदस्त होता. की तिचा जागीच मृत्यू झाला. त्याचा राग इतक्यावरच थांबला नाही तर आरोपीने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला देखील घराजवळ असलेल्या झाडाला दोरीने गळफास देऊन ठार मारले. नंतर त्याने आपल्या मेहुण्याला व्हिडीओ कॉल करून पत्नी आणि मुलाचे मृतदेह दाखवले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.