मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (11:09 IST)

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक

आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपीला अटक करण्यात आली तेव्हा देखील तो मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. आरोपीचे नाव समीर असून तो एका हॉटेल मध्ये काम करतो .
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील मुलगी 3 वर्षांपूर्वीच बिहारमधून दिल्लीत आली होती. मुलीचे कुटुंब मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . 
शनिवारी दुपारी 3 वाजता पीडिता तिच्या बहिणीसोबत जवळच्या मंदिरात गेली होती. पीडित मुलगी मंदिरातून पायी जात असताना समीर नावाचा आरोपी तेथे पोहोचला. 
आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
यानंतर मुलगी जखमी अवस्थेत 8 वाजता घरी पोहोचली आणि घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय बूढ़पूरच्या जंगलात मुलीवर बलात्कार झालेल्या ठिकाणी पोहोचले. कुटुंबीयांनी अलीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी घटनेनंतर पसार झाला होता.  पोलिस पथकाने शोध सुरू केला. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. बराच तपास केल्यानंतर समीर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपी समीरला अटक केली, त्यावेळी देखील आरोपी मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म पाहत होता.